॥ श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ अनसूया मातायै नमः ॥ रजि. नं. ए-२४६ (नांदेड)
🕉

प्रमुख उत्सव

श्री दत्तात्रय शिखर संस्थान माहूरगडातील महत्त्वाचे उत्सव

🎉
चैत्र शु. प्रतिपदा

गुढी पाडवा व पंचांग वाचन

गुढी पाडव्यानिमित्त नूतन वर्षाचे स्वागत व पंचांग वाचन. श्री दत्तात्रय शिखर व अनसूया माता मंदिर येथे विशेष पूजा.

🎉
चैत्र शु. नवमी

राम नवमी

श्री राम जन्मोत्सव. विशेष पूजा व रामायण पठण. प्रसाद वितरण.

🎉
चैत्र पौर्णिमा

हनुमान जयंती उत्सव

श्री हनुमान जयंतीनिमित्त विशेष पूजा व सुंदरकांड पठण.

🎉
वैशाख पौर्णिमा

अनसूया माता मंदिर - अमरस पौर्णिमा / वैशाख पौर्णिमा

अनसूया माता मंदिर येथे अमरस पौर्णिमा व वैशाख पौर्णिमेचे विशेष उत्सव. अभिषेक व पूजा.

🌺 पवित्र गुरुपौर्णिमा उत्सव — माहूरगड 🌺
आषाढ पौर्णिमा

🌺 पवित्र गुरुपौर्णिमा उत्सव — माहूरगड 🌺

🕉️ श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड 🕉️ माहूरगडच्या पावन भूमीत गुरुपौर्णिमेच्या मंगल पर्वावर भक्तीचा आणि श्रद्धेचा महासागर अनुभवायला मिळाला. श्री दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविकांनी माहूरगड येथे उपस्थिती लावली. या पवित्र गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त परमपूज्य श्री श्री १००८ डॉ. धनेश्वर भारती महाराज गुरु मधुसूदन भारती महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.

राखी पौर्णिमा - नारळी पौर्णिमा व अखंड दत्तनाम सप्ताह
श्रावण पौर्णिमा

राखी पौर्णिमा - नारळी पौर्णिमा व अखंड दत्तनाम सप्ताह

पवित्र श्रावण महिन्यातील श्रावण शुक्ल चतुर्दशी, नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) या महापर्वावर भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेने जीवाच्या मोक्षप्राप्तीसाठी श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा आयोजित केली जाते. या दिवशी ३३ कोटी सव्वा लक्ष एकशे दहा देवता हे सुधा या गुप्त रुपात-पवित्र दिवशी पंचक्रोशी करून असा पुरातन उलेख आहे. या दिवशी सर्व पवित्र जल एकत्र करून सह्याद्री पर्वताच्या कडेकपाऱ्यांमध्ये विराजमान असलेल्या विविध देवी-देवतांना विधिवत अभिषेक व पूजा केली जातो. भगवान श्री दत्तात्रयांना प्रसन्न करून जीवाला मोक्षप्राप्ती व्हावी, जन्मोजन्मीची पापे नष्ट व्हावीत आणि आत्मशुद्धी प्राप्त व्हावी या उद्देशाने ही पंचक्रोशी परिक्रमा केली जाते. प्रदक्षिणा म्हणजे परमेश्वराभोवती श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने घातलेला पवित्र वेढा होय.

🎉
श्रावण कृ. अष्टमी

श्रीकृष्ण जन्मोत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्सव.

🎉
श्रावण अमावस्या

बैल पोळा

बैल पोळ्यानिमित्त बैलांची पूजा व उत्सव.

🎉
भाद्रपद शु. चतुर्थी

गणपती उत्सव

दहा दिवसांचा गणपती उत्सव. विविध धार्मिक कार्यक्रम व आरती.

🎉
भाद्रपद शु. अष्टमी

जेष्ठ गौरी आवाहन - श्री महालक्ष्मी पूजन (अनसूया माता मंदिर)

अनसूया माता मंदिर येथे जेष्ठ गौरी आवाहन व श्री महालक्ष्मी पूजन. विशेष अलंकार व सजावट.

🎉
भाद्रपद पौर्णिमा

भाद्रपद पौर्णिमा - अंबिल प्रसाद (अनसूया माता मंदिर)

अनसूया माता मंदिर येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त अंबिल प्रसाद वाटप. सर्व भाविकांना मोफत प्रसाद.

🎉
अश्विन शु. प्रतिपदा

घटस्थापना व नवरात्री उत्सव (अनसूया माता मंदिर)

अनसूया माता मंदिर येथे घटस्थापना व नऊ दिवसांचा नवरात्री उत्सव. दररोज विशेष पूजा व आरती.

🎉
अश्विन पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष महापूजा. रात्री चंद्रदर्शन व दूध वाटप.

🎉
कार्तिक शु. प्रतिपदा

पाडवा दीपावली उत्सव - लक्ष्मी पूजन

दीपावली पाडवा व लक्ष्मी पूजनाचे आयोजन. दीपोत्सव व फटाके.

🎉
कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त विशेष पूजा व दीपदान.

🎉
द्वादशी

द्वादशी - प.पू.महंत श्री संतोष भारती महाराज यांचा भंडारा

प.पू.महंत श्री संतोष भारती महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा. हजारो भाविकांना महाप्रसाद.

🎉
मार्गशीर्ष पौर्णिमा

दत्त घटस्थापना / पालखी उत्सव - ५ किवा ७ दिवस दत्तजन्म सोहळा

दत्त घटस्थापना, ५ किवा ७ दिवसांचा पालखी उत्सव व दत्त जन्म सोहळा. मार्गशीर्ष पौर्णिमेला भव्य यज्ञ व महाप्रसाद.

🎉
मकर संक्रांती

मकर संक्रांती

मकर संक्रांतीनिमित्त विशेष तिळगूळ वाटप व पूजा.

🎉
फाल्गुन कृ. त्रयोदशी

महाशिवरात्री

महाशिवरात्रीनिमित्त रात्रभर जागरण. रुद्राभिषेक, शिव महिमा भजन व पूजा.

🎉
फाल्गुन पौर्णिमा

होळी

होळी पौर्णिमेनिमित्त होळी दहन व विशेष पूजा.

🎉
चैत्र कृ. प्रतिपदा

धुलिवंदन

धुलिवंदनाचे उत्सव. रंगोत्सव व आनंदोत्सव.

🎉
२६ जानेवारी

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनाचे विशेष कार्यक्रम. ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम.

🎉
१५ ऑगस्ट

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम. ध्वजारोहण व देशभक्ती गीते.