श्री दत्तात्रय प्रभू जागृत स्थान व अनसूया मातेचे शक्तिपीठ
रजि. नं. ए-२४६ (नांदेड)
संस्थानाचे उद्दिष्ट म्हणजे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यांद्वारे समाजाची सेवा करणे. निःशुल्क भोजन, आरोग्य सेवा व निवास सुविधा उपलब्ध करणे. भाविक भवांना निःशुल्क आरोग्य सुविधा व रुग्ण वाहिका. भाविक भवांना राहण्यासाठी उत्तम भवांनिवासाचे बांधकाम काम चालू आहे — लवकरच आपल्या सेवेत.
श्री दत्तात्रय शिखर संस्थान माहूरगडाची दृष्टी म्हणजे भाविकांना सर्वोत्तम आध्यात्मिक अनुभव देणे आणि समाजसेवा करणे.
रजि. नं. ए-२४६ (नांदेड)
श्री दत्तात्रय प्रभू जागृत स्थान व अनसूया मातेचे शक्तिपीठ
श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड

।। प्रभू श्रीदत्तात्रेयाय नमः ।। नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगड है ऐतिहासिक, कृतिक आणि पौराणिक तसेब धार्मिक दृष्टिकोनीतून अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. समुद्र टीपासून १९०० फूट उंचीवर असलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेषु पैनगंगेच्या परिक्रमेत वसलेले आहे. श्रीक्षेत्र माहूरगडच्या तीर्थमहिम्यात श्रीअनसूया माता, श्रीदत्तात्रेय व श्रीरेणुकादेवी या देवदेवतांची मंदिरे अत्यंत पौषाणिक मानली जातात. श्रीदन शिखर हे श्रीदत्तात्रेयांचे मंदिर माहूर पासून ६ मैलावर एका शिखरावर विराजमान झाले आहे. महंत मुकुंद भारती यांनी १,२९७ मध्ये हे मंदिर बांधले असे कथन केले जाते. श्री दत्तशिखराला महंतांची परंपरागत गादी असून सध्या या गादींवर महंत प.पू.डॉ.श्री श्री श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती महाराज, हे विराजमान आहेत. माहूरगड हे श्री दत्तात्रेयाचे जन्मस्थान! श्रीदत्तात्रेय हे अत्रिऋषी व महासती अनसूया माता यांचे पुत्र ! श्रीदत्तात्रेयाच्या जन्माविषयी अशी कथा सांगितली जाते की, श्रीब्रम्हा, श्रीविष्णू आणि श्रीमहेश हे अत्रिऋर्षीची पत्नी महासती अनसूया हिच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या आंक्षमांत ऋषींचा वेश धारणा करून भिक्षा मागण्यासाठी जातात त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भिक्षा देण्यासाठी अनसूया माता त्यांचे लहान बालकांमध्ये रूपांतर करून त्यांना स्तनपाने करविते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश तिच्यावर प्रसन्न होऊन तिला वर मागण्यांस सांगतात. तेव्हा त्या वर प्रसादाने प्रभू दत्तात्रेय अवतीर्ण झाले. त्रिदेवांचा एकत्रित अवतार म्हणले अंतसूयानंदन श्रीदत्तप्रभू! श्रीगुरुदेव दत्तात्रेयांचे सोळा अवतार मानले जातात. तसेच श्रीदत्तात्रेयांनी स्वतः चोविस गुरु मानले आहेत. मंदिरातील धुनीघराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्रेतायुगात, पिंगलनाग नामक ऋषींनी येथे तपश्चर्या करून दत्तदर्शन प्राप्त केले होते. ही धुनी आजही जागृत आहे. श्रीदत्तशिखराच्या खालच्या बाजूस सर्वतीर्थ हे प्राचीन असे पाण्याचे खोत आहे. येथील बांधकामात एक वेगळी कलाकुसर बघायला मिळते. या सर्वतिर्थावरून रोज श्रीदत्तात्रेय शिखर व अनसूया माता मंदिर येथे पूजेसाठी पाणी नेले जाते. दत्त जयंतीचा सोहळा येथे मोठ्या उत्साहाने संपन्न होतो. पालखी सोहळ्यात अनेक सश्रद्ध भक्तांची मांदियाळी जमते. दत्तशिखर हे शक्तिपीठ श्रीदत्तात्रेयाचे निद्रास्थान सुद्धा आहे.
मंदिरे पाहामाहूरगडचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व
माहूरगड हे श्री दत्तात्रय प्रभूंचे जागृत स्थान आहे. येथे मागितलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे.
श्री दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू व शिव यांचे एकत्रित स्वरूप आहे. त्यामुळे हे स्थान तिन्ही देवांचे आशीर्वाद देणारे आहे.
कैलास टेकडी ही साधकांसाठी तपश्चर्येचे स्थान आहे. येथे ध्यान व योगाभ्यास केल्याने विशेष फल प्राप्त होते.
अनसूया माता मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. येथे माता अनसूयेची आराधना विशेष फलदायी ठरते.
मंदिराच्या विकासाची ऐतिहासिक वाटचाल
श्री दत्तात्रय प्रभूंच्या आगमनाने हे स्थान पवित्र झाले. अनसूया मातेचे वास्तव्य या स्थानाला विशेष पावित्र्य दिले.
भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नवीन बांधकाम सुरू झाले.
श्री दत्तात्रय शिखर संस्थान या नावाने नोंदणी झाली. रजि. नं. ए-२४६ (नांदेड). व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.
भाविकांसाठी आधुनिक सुविधा, धर्मशाळा व भोजनालय सुरू करण्यात आले.
लाईव्ह दर्शन, ऑनलाईन देणगी व डिजिटल सेवा सुरू करण्यात आल्या. भाविकांसाठी संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध.
माहूरगड येथील भाविकांचे व यात्रिकांचे विशेष क्षण


श्री दत्तात्रय शिखर संस्थान व्यवस्थापन समिती
अध्यक्ष
श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड
सचिव
कोषाध्यक्ष
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त (शासकीय)
व्यवस्थापक