श्री दत्तात्रय प्रभू जागृत स्थान व अनसूया मातेचे शक्तिपीठ
रजि. नं. ए-२४६ (नांदेड)
भाविकांसाठी उपलब्ध सर्व सेवा व सुविधा
श्री दत्त मंदिर माहूरगड येथे निःशुल्क भोजनाची व्यवस्था. भाविकांना दररोज महाप्रसाद दिला जातो. वेळ सकाळी ११.०० ते 3 पर्यंत व रात्री ८:०० ते १०:०० पर्यंत
भाविक भवांना निःशुल्क आरोग्य सुविधा व रुग्ण वाहिका उपलब्ध आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा तत्पर.
भाविक भवांना राहण्यासाठी उत्तम भवांनिवासाचे बांधकाम काम चालू आहे. लवकरच आपल्या सेवेत.
मंदिर परिसरात मोठी पार्किंग व्यवस्था आहे. दुचाकी, चारचाकी व बस पार्किंग उपलब्ध.
शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संपूर्ण परिसरात केली आहे.
मंदिर परिसर नेहमी स्वच्छ व पवित्र ठेवला जातो. दैनंदिन स्वच्छता मोहीम राबवली जाते.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राण ठेवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध आहे.
मंदिर परिसरात पूजेचे साहित्य व प्रसाद विकत मिळते. फुले, माला, अगरबत्ती उपलब्ध.
मंदिर परिसरात WiFi इंटरनेट उपलब्ध आहे. लाईव्ह दर्शनाची सुविधा YouTube वर उपलब्ध.
मंदिरात प्रवेश करताना स्वच्छ व शालीन पोशाख घालावा. मंदिर परिसरात मोबाईल फोन शांत ठेवावा. कोणत्याही प्रकारचे नशेले पदार्थ मंदिर परिसरात आणू नयेत. मंदिराची स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे.
आपल्या देणगीमुळे निःशुल्क सेवा अखंड सुरू राहतात